पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आज अंगारकी चतुर्थीला गाभाऱ्यातून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे पाच लाख भाविक अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी येत असतात. पुण्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ट्रस्टने फक्त आज मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे, असे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी सांगितले. (व्हिडिओ - शहाजी जाधव)